IJRTI
International Journal for Research Trends and Innovation
International Peer Reviewed & Refereed Journals, Open Access Journal
ISSN Approved Journal No: 2456-3315 | Impact factor: 8.14 | ESTD Year: 2016
Scholarly open access journals, Peer-reviewed, and Refereed Journals, Impact factor 8.14 (Calculate by google scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool) , Multidisciplinary, Monthly, Indexing in all major database & Metadata, Citation Generator, Digital Object Identifier(DOI)

Call For Paper

For Authors

Forms / Download

Published Issue Details

Editorial Board

Other IMP Links

Facts & Figure

Impact Factor : 8.14

Issue per Year : 12

Volume Published : 11

Issue Published : 121

Article Submitted : 24726

Article Published : 9361

Total Authors : 24875

Total Reviewer : 861

Total Countries : 169

Indexing Partner

Licence

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License
Published Paper Details
Paper Title: Sanvadi Shikshan Paddhatine Nibandhalekhan Shikavane: Ek Abhyas
Authors Name: Dr. Santosh Rajeshwarrao Selukar
Download E-Certificate: Download
Author Reg. ID:
IJRTI_212166
Published Paper Id: IJRTI2605037
Published In: Volume 11 Issue 5, May-2026
DOI:
Abstract: संवादी शिक्षण पद्धतीने निबंधलेखन शिकणे: एक अभ्यास 1) प्रस्तावना निबंध लेखन ही एक प्रकारची अभिव्यक्ती असते. प्राप्त ज्ञानाचा उपयोग करुन स्वत:ला आलेले अनुभव,जाणवलेल्या संवेदना, भावना, विचार, अभिव्यक्ती, मत, दृष्टीकोन, कल भाषेद्वारे मांडणे अर्थात निबंध लेखन करणे होय. निबंध लेखन म्हणजे केवळ शब्द लिहिणे नव्हे तर विचारांची मांडणी, मुद्दे तार्किक पद्धतीने मांडणे, योग्य शब्दांचा वापर करणे, विषयाबद्दलचे सखोल ज्ञान मांडणे इ.कौशल्ये त्यात अंतर्भूत असतात. विचारशक्ती, भाषिक कौशल्य, तार्किक मांडणी, सर्जनशीलता, अभिव्यक्ती इ. क्षमता अवगत करुन निबंधलेखन कौशल्य प्राप्त होते. हे एक सृजनात्मक कौशल्य आहे. सृजनात्मक कार्यातून व्यक्तीची विचारशक्ती विकसित होते. जीवनदृष्टी सुद्धा यामुळे बदलत असते. निबंध लेखनासारख्या स्वअभिव्यक्ती कौशल्याला मराठी विषयामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. साधारणपणे इयत्ता तिसरी पासून ते आठवी आणि त्यापुढीलही इयत्तांमध्ये निबंध लेखन हा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो. विद्यार्थ्यांच्या निबंधलेखनाकडे पाहिले असता असे लक्षात येते की फार कमी विद्यार्थी उत्कृष्ट निबंध लेखन करू शकतात. अगदी थोडक्या स्वरूपातले असणारे त्यांचे निबंध लेखन फारसा त्याबद्दल आत्मविश्वास देखील त्यांच्याकडे नसतो याबाबीमुळेच निबंध लेखनाचे महत्त्व समजणे त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. निबंध लेखनामध्ये विद्यार्थ्यांनी नवनवीन कवितेच्या ओळी, दाखले, उदाहरणे, दृष्टांत, छोट्याशा गोष्टी यांचा अंतर्भाव देखील आपल्या निबंधामध्ये केला पाहिजे आणि त्याद्वारे आपले म्हणणे पटवून दिले पाहिजे.प्राप्त असलेले ज्ञान योग्य पद्धतीने मांडणे,एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तू, प्रसंगाचे स्वत:च्या शब्दात वर्णन करणे अशा सर्व प्रकारच्या बाबी निबंधात समाविष्ट व्हाव्यात म्हणजेच विद्यार्थ्यांनी निबंधलेखनाविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन व्हावे यासाठी प्रस्तुत संशोधन हाती घेतलेले आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ व शिक्षक यांच्याशी बोलतांना असे लक्षात आले की गप्पा मारता-मारता संवादी शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांच्या निबंध लेखनामध्ये सुधारणा करता येऊ शकते. पारंपारिक पद्धतीने निबंध लेखन शिकवण्यापेक्षा गप्पांच्या माध्यमातून जर निबंध लेखनाविषयी मार्गदर्शन केले तर त्यामध्ये एक प्रकारची सहजता येईल व विद्यार्थी संवाद माध्यमातून निबंध लेखन अवगत करतात.यासाठी गप्पांचे सत्र आयोजित करण्यात यावे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना निबंध लेखनाबद्दलचे मार्गदर्शन व्हावे असा विचार पुढे आला.एखाद्या व्यक्ती किंवा स्थळाविषयी आपण कसे विधान लिहू शकतो आणि त्याचा निबंधामध्ये कसा वापर केला जाऊ शकतो या विषयी प्रामुख्याने गप्पा करणे अपेक्षित आहे.विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. त्यातून संवादी पद्धतीने गप्पा मारता-मारता निबंध लेखन शिकणे सहज विद्यार्थ्यांना जमू शकते असा विचार पुढे आला. सदरील संशोधनात विद्यार्थ्यांच्या सोबत एक तास गप्पांचे सत्र आयोजित करून त्याबद्दल विद्यार्थ्यांना बोलते केले जाते. जे गप्पांमध्ये बोलले जाते, ऐकले जाते पुढे त्याचाच निबंध लेखनात उपयोग होतो. स्वतःचा विषय कसा निश्चित करावा, विषयाबद्दलची आपल्याला ज्ञात असलेली माहिती व त्या माहितीची शब्दांमध्ये करावयाची सुरेख मांडणी याची उदाहरणे या गप्पांमधून विद्यार्थ्यांना दिली जातात. प्रत्यक्ष निबंधांमधील विधाने कशी असतील याचाही अंदाज या गप्पांच्या सत्रामध्ये मुलांना येतो. उदा. 1) मी पाहिलेली सर्कस या विषयी गप्पा सत्र 1.तिथे एक प्राणी पाहिला. 2.तिथे एक हत्तीसारखा प्राणी पाहिला. 3.तिथे एक हत्तीसारखा धिप्पाड प्राणी पाहिला. 4.तिथे एक धिप्पाड प्राणी नव्हे तर जणू हत्तीच असावा. 5.धिप्पाड असणा-या प्राण्यांची माझी भेट झाली आणि मला तो हत्ती बोलला, सर्कस पाहणारी मुलं किती आनंदी आहेत आम्ही मात्र या सर्कसमध्ये बंदिस्त आहोत. Figure 1. 2) गप्पा सत्रातील चित्रावरुन निबंध लेखन (केळीच्या झाडाचे चित्र दाखवणे) figure 2. विद्यार्थी निरीक्षण करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना बोलते करतात. वि 1: हे केळीचे झाड खूप सुंदर आहे. (वर्णन) वि.2: हे केळीचे झाड फळांनी वाकलेले दिसत आहे. (चित्रवर्णन) वि.3: केळीच्या झाडाला फांद्या नसतात (माहितीपर) वि.4: एकही बी नसलेले फळ म्हणजे केळी असते, त्याच केळीचे हे घड म्हणजे आईच्या अंगावर खेळणारी जणू मुलेच आहेत. (माहिती आधारे वर्णन) वि.5: झाडाकडे पाहून मला असे वाटले की त्याला एका जागेवर असे का बंदी केले असेल, विचा-याला खेळता बागडताही येत नाही. (मुक्त कल्पना) वि.6: हेच झाड मला भेटले होते ते बोलले, अरे बाळांनो रासायनिक खते आणि तणनाशके वापरुन सारेच शेतकरी माझं आनंदी आणि स्वच्छंदी जगच संपवायला निघालेले आहेत. (सर्वसमावेशक ) अशा प्रकारे संवादी पद्धतीने गप्पांना सुरुवात होते. प्रत्येक मुलगा आपले विधान मांडतो त्यात काही विधाने माहितीपर विधाने असतात. काही वर्णन करणारी विधाने असतात. काही संमिश्र विधाने असतात. काही मुक्त काल्पनिक असतात. काही सर्वसमावेशक विधाने असतात. ही सर्व विधाने कशा प्रकारची आहेत हे शिक्षक त्यांना वेळोवेळी गप्पा सत्रात स्पष्ट करत असतात. अशा शिक्षक-विद्यार्थी परस्पर गप्पांमुळे मुले खूप छान प्रकारे निबंध लेखन शिकतात याविषयी अधिक अभ्यास करणे यासाठी प्रस्तुत संशोधन हाती घेण्यात आले आहे. आजच्या शालेय शिक्षणात भाषा शिक्षणाचे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या विचारांनाअचूक, सुव्यवस्थित आणि परिणामकारक रितीने व्यक्त करता येणे. या अभिव्यक्ती साठी निबंध लेखन हा एक प्रभावी मार्ग आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक विद्यार्थ्यांना निबंध लिहिताना भीती, संकोच, कल्पनांची कमतरता किंवा भाषिक असहजता इ.अंतर्गत घटकाबरोबरच कंटाळा, एकाग्रता या सारखे बाह्यघटकही कारणीभूत असल्याचे जाणवते. अशा वेळी पारंपारिक शिक्षण पद्धतीपेक्षा गप्पा मारता मारता निबंध लेखन सारखी संवादी पद्धती अधिक परिणामकारक ठरते. संवाद करतांना भाषा शिक्षणात विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती कौशल्याचा विकास होणे अपेक्षित असते. परंतु आज अनेक विद्यार्थ्यांना निबंध लेखन हा ताणतणावपूर्ण आणि कंटाळवाणा विषय वाटतो. या पार्श्वभूमीवर गप्पा मारता मारता निबंध लेखन ही पद्धत विद्यार्थ्यांना लेखनासाठी प्रोत्साहन, प्रेरणा आणि आत्मविश्वास देते. विद्यार्थी गप्पांच्या सत्रात स्वत:चे अनुभव,आनंद, आठवणी आणि माहिती सांगतो त्याचेच तर निबंधामध्ये रुपांतर होत असते आणि तयार होतो निबंध! गप्पांमध्ये विद्यार्थी ज्या सहजतेने आपल्याला आलेले अनुभव, विचार, कल्पना, किंवा एखाद्या प्रसंगाचे वर्णन करतो, स्वत:चे मत मांडतो,कल दर्शवतो अथवा दृष्टीकोन मांडत असतो तेवढी सहजता त्याच्या लेखनात अशा गप्पाच्या सत्रामुळे येऊ शकते.त्यातून त्याचे निबंधलेखन अधिकाधिक प्रभावी व समृद्ध होत जाते.
Keywords: संवादी शिक्षण पद्धती निबंध लेखन
Cite Article: "Sanvadi Shikshan Paddhatine Nibandhalekhan Shikavane: Ek Abhyas", International Journal for Research Trends and Innovation (www.ijrti.org), ISSN:2456-3315, Vol.11, Issue 5, page no.a320-a333, May-2026, Available :http://www.ijrti.org/papers/IJRTI2605037.pdf
Downloads: 000205581
ISSN: 2456-3315 | IMPACT FACTOR: 8.14 Calculated By Google Scholar| ESTD YEAR: 2016
An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 8.14 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator
Publication Details: Published Paper ID: IJRTI2605037
Registration ID:212166
Published In: Volume 11 Issue 5, May-2026
DOI (Digital Object Identifier):
Page No: a320-a333
Country: Parbhani, Maharashtra, India
Research Area: Social Science and Humanities 
Publisher : IJ Publication
Published Paper URL : https://www.ijrti.org/viewpaperforall?paper=IJRTI2605037
Published Paper PDF: https://www.ijrti.org/papers/IJRTI2605037
Share Article:

Click Here to Download This Article

Article Preview
Click Here to Download This Article

Major Indexing from www.ijrti.org
Google Scholar ResearcherID Thomson Reuters Mendeley : reference manager Academia.edu
arXiv.org : cornell university library Research Gate CiteSeerX DOAJ : Directory of Open Access Journals
DRJI Index Copernicus International Scribd DocStoc

ISSN Details

ISSN: 2456-3315
Impact Factor: 8.14 and ISSN APPROVED, Journal Starting Year (ESTD) : 2016

DOI (A digital object identifier)


Providing A digital object identifier by DOI.ONE
How to Get DOI?

Conference

Open Access License Policy

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License

Creative Commons License This material is Open Knowledge This material is Open Data This material is Open Content

Important Details

Join RMS/Earn 300

IJRTI

WhatsApp
Click Here

Indexing Partner